Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.
Goa Film City project प्रगती पथावर – मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले – “Private Investors चे स्वागत आहे!”
Goa Film City प्रकल्पाला काणकोणची जमीन देवून गावकऱ्यांनी ग्राम सभेत घेतलेल्या ठरावा द्वारे आधीच मान्यता दिली आहे. 199.85 Cr च्या या प्रकल्पात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी “Private Investors चे ही स्वागत आहे!” असे म्हटले आहे.
Goa Film City Cancona,Goa
दोन दशके राष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या यशस्वी आयोजनानंतर आता गोव्यात खाजगी गुंतवणुकीतून Goa Film City आकार घेणार आहे
2004 पासून दिल्लीत संपन्न होणारा राष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोवा येथे स्थलांतरीत केला गेला . मध्यवर्ती गोव्याची मुंबई व दक्षिणी चित्रपट सृष्टीशी नजीकता पहाता हे एक योग्य पाऊलच होते. आता गेले दशकभर चर्चेत असलेला गोवा सरकारचा ‘Goa Film City Project’ ही अखेर कार्यान्वित होत असल्याचे दिसू लागले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या प्रयत्नांना स्थानिकांचा प्रतिसाद आधीच मिळाला आहे. नुकतेच मुख्यमंत्र्यांनी “Private Proposals चे स्वागत आहे!” असे Goemkarponn TV या स्थानिक channel च्या प्रतिनिधीस उत्तर देताना म्हटले आहे.
खाजगी गुंतवणूकदारांचे Goa Film City Project मधे स्वागत आहे -मुख्यमंत्री प्रमोद सावंत
काय असते Film City?
Film City म्हणजे एका विस्तीर्ण जागेत अनेक प्रकारचे shoot locations आधीच तयार करून ठेवलेले असतात. हा एका अर्थी विशाल असा Studio असतो. यातील लोकेशन्स अनेकविध प्रकार ची असू शकतात. .
उदाहरणार्थ
गाव वा शहराची बाजारपेठ,
छोटे गाव व घरे, विहीर इतर
बंगले,
प्रार्थना स्थळे,
पोलिस स्टेशन,
बगीचा,पानवठे
रेस्टॉरंट, कॅफे
कोर्ट व इतर इमारती,
पोलिस चौकी
पेट्रोल पंप
हाणामारीच्या दृश्यांसाठी विशिष्ट सुविधा युक्त लोकेशन्स…
कलाकारांसाठी व तंत्रज्ञांसाठी राहण्याची सोय ही या STUDIO मधे असते.
अशा प्रकारे सर्रासपणे चित्रपटात वापरात येणारी चित्रिकरण स्थळे व इमारती कायमस्वरूपी या स्टूडिओत आधीच उभारून ठेवलेली असतात. वेगवेगळ्या प्रकारची लोकेशन्स एकाच परीघात उपलब्ध झाल्याने चित्रीकरणाचा यातायात खर्च व वेळ ही वाचतो
या studio मधे शूटींग साठी लागणारी सर्व उपकरणे उपलब्ध असतात. सिनेमाचे post Production अर्थात एडीटींग व इतर तांत्रिक सुविधा ही या filmcity च्या कक्षेतच उपलब्ध होवून जातात.
निर्मात्याने फक्त आपले तंत्रज्ञ व कलाकार घेवून filmcity मधे यावे व पूर्ण चित्रपट तयार करून filmcity तून बाहेर पडावे अशा संकल्पनेवर ही filmcity उभारली गेली असते.
हैद्राबाद च्या रामोजी राव फिल्म सिटी चे उदाहरण
अशा प्रकारची फिल्मसिटी हैद्राबाद येथे आधीच कार्यरत आहे.प्रसिद्ध निर्माते व उद्योगपती रामोजी राव यांनी ही त्यांची Ramoji Film City यशस्वीरीत्या चालवून दाखवली आहे व film City ही संकल्पना एक Viable Film Media business proposal असल्याचे सिद्ध केले आहे.
UP ची होवू घातलेली filmcity
उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगीजी यांनीही अशा पद्धतीची filmcity UP मधे उभारण्याची घोषणा अलिकडेच केली होती.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या जमीन संपादन प्रयत्नांना आधीच यश -आता खाजगी गुंतवणूकदारांना आमंत्रण
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना स्थानिक वृत्तवाहिनी @Goemkarponn TV च्या निवेदकाने Goa Film City Project च्या कामाच्या प्रगतीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी खालीलप्रमाणे उत्तर दिले आहे
https://www.facebook.com/share/r/1889zWMgdW/
250 एकरच्या भगवती पठारावर Goa Film City
दक्षिण गोवा येथील काणकोण या प्रांतातील 250 एकरचे विस्तीर्ण असे ‘भगवती पठार’ गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी Goa film City साठी निवडले आहे.
गावकर्यांचा सुरुवातीचा विरोध मावळला
भगवती पठाराची जैव विविधता व पाण्याचा स्त्रोत या मुद्यांवरून स्थानिक लोलेम ( Loliem) गावच्या ग्रामस्थांनी सुरूवातीस या प्रकल्पाला विरोध दर्शवला. सरकार कडून filmcity project हा GREEN PROJECT असून यात कुठल्याही प्रकारची निसर्ग हानी होणार नाही हे स्थानिकांना पटवून देण्यात आले. अखेर गेल्या August मधे झालेल्या लोलेम गाव च्या ग्रामसभेत 54 पैकी 50 सदस्यांनी बहुमताने
गोव्यातील महत्वाकांक्षी प्रोजेक्ट साठी जमीन देण्यास अनुकूलता दर्शविली. अध्यक्ष वीश्वजीत वारीक यांच्या पुढाकाराने हा ठराव संमत केला गेला. सदर 250 एकर जागा ही शेतीसाठी अयोग्य प्रकारात ( Incultivable land )मोडत असल्याकारणाने शेती उद्योगावर याचा कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही असे दिसते. तसेच सदर जमीन भाडेतत्त्वावर हस्तांतरित होत आहे त्यामुळे भूमीपुत्रांची जमीन मालकीही त्यांच्याकडेच रहाणार आहे.
याआधीच लोलेम गाव ग्रामसभेने WAPCOS या Hybrid Solar Project राबणाऱ्या कंपनीस 750 एकर क्षेत्रफळाची जागा भाडेपट्टीवर दिली आहे या अनुषंगाने Filmcity सारख्या Green Project साठी विरोधी भूमिका राबवणे अव्यवहार्य असल्याचे स्पष्ट होते.
स्थानिक तरूणांना रोजगार संधी
Filmcity प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 500 स्थानिक तरूणांना रोजगार देण्याची हमी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्थानिकांना दिली आहे.
रविंद्र भवन मधे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती
कानकोण च्या रविंद्र भवन मधे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या Filmcity प्रकल्पाची अधिकृत घोषणा केली होती. या Filmcity ला ‘लता मंगेशकर कलांगण’ असे नाव देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले होते.
Auditorium
तसेच सदर Film City मधे एक भव्य Auditorium उभारून त्यास कानकोण चे MLA संजय बांदेकर यांचे नाव देण्यात येईल असे त्यांनी त्यावेळी सांगितले होते.
Administrative building
प्रकल्पा साठी लागणार्या तालुका पातळीवरील Administrative building चे काम याआधीच सुरू झाले आहे.
ESG -Entertainment Society of Goa ची महत्त्वपूर्ण भूमिका
Goa कला अकादमी चे चेअरमन श्री विष्णू सूर्या वाघ हे ESG चे Vice Chairman आहेत. श्री विष्णू सूर्या वाघ यांनी IFFI च्या परिसंवादात येत्या दोन वर्षांत Goa Filmcity प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा आपला संकल्प बोलून दाखवला.
ESG ही संस्था मुळात IFFI व भारत सरकार मधे समन्वय साधण्यासाठी स्थापली गेली होती. आता हीच संस्था Film City प्रकल्पाला प्रत्यक्ष कार्यान्वित करणार आहे. ESG द्वारे प्रकल्पाचे Tender काढणे व या व्यवहारात मार्गदर्शन पर consultant नियुक्ती करण्याचे काम करण्यात येणार आहे.
Investors साठी Goa Film City ही सुवर्ण संधी
भारतीय रुपयांत म्हटले तर 1,998,501,013 INR ( अर्थात 199.85 करोड रुपये) एवढ्या बजेट चा हा प्रकल्प आहे असे गोवा सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर नमूद आहे.
सदर Goa Filmcity प्रकल्पा ची वित्त उभारणी PPP (Public Private Partnership) या संयुक्त आर्थिक तत्वावर करण्यात येईल. खाजगी निवेशकांसाठी ही एक सूवर्णसंधी आहे. सरकारी सहभागामुळे कुठल्याही प्रशासकीय अडथळ्यांची संभावना हा प्रकल्प कार्यान्वित करताना येणार नाही.
गोवा हे चित्रपट सृष्टीसाठी चित्रीकरणाचे आवडते स्थळ. Film City मुळे सूलभता.
राष्ट्रीय चित्रपट महोत्सवा च्या इथल्या आयोजना मुळे याआधीच गोव्याला चित्रपट संस्कृती चे अधिकृत परिमाण लाभले आहे.असे असले तरी गोव्यात चित्रपट निर्मिती उद्योगासाठी लागणार्या पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. अगदी चित्रीकरणासाठी लाईट मागवायची झाल्यास कोल्हापूर हून त्या मागवाव्या लागतात. अशा परिस्थितीत एक Dedicated व भव्य स्टुडिओ दक्षिण गोव्यात उभा रहातोय ही गोष्ट नक्कीच दिलासादायक आहे.
Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.
Thanks Sofea. Yes it will surely. There is also an another project comming up in Goa . It’s by Good Craft Spirit Company. They are building a SPIRIT HUB on large scale in Goa. Do read about it on the hyper link given in same Blog
Thanks for detail information
Thanks a lot for reading Rohit ji🙏
Thank you for sharing details this will boost real estate industry
Thanks Sofea. Yes it will surely. There is also an another project comming up in Goa . It’s by Good Craft Spirit Company. They are building a SPIRIT HUB on large scale in Goa. Do read about it on the hyper link given in same Blog